१२ प्रवासी थोडक्यात बचावले; हायवेवर टायर फुटल्याने धावती जीप खड्ड्यात उलटली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 08:56 PM2023-01-31T20:56:20+5:302023-01-31T20:57:40+5:30
पाथरी-सोनपेठ महामार्गावर अपघात, यात जीपमधील 12 जण जखमी झाले.
पाथरी ( परभणी) : टायर फुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूच्या खड्यात उलटल्याची घटना आज दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास पाथरी-सोनपेठ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब वर कानसुर वस्तीजवळ घडली. यात जीपमधील 12 जण जखमी झाले.
पाथरी-सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर 26 जानेवारी रोजी सकाळी दुचाकीच्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याच अपघातस्थळाच्या अगदी जवळ आज दुपारी 1.15 वाजेच्या सुमारास सुमारास अचानक जीपचे ( क्रमांक एम एच 46 ए डी 54 45) टायर फुटल्याने अपघात झाला. माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि नागरिकांनी जखमींना जीपमधून बाहेर काढत पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातात जखमींची नावे अशी
देपेगाव (ता माजलगाव ) येथील दत्तराव बाळासाहेब काळे ,सुवर्णा किशोर काळे ,गणेश अशोक ढेरे ,विलास अच्युतराव जाधव ,तारामती प्रभाकर काळे ,पांडुरंग गणेशराव काळे ,रेणुका भगवान गायकवाड , मळूबाई ढवळे ,शकुंतला दत्तात्रय काळे ,सुरेश किशोर काळे ,दत्तात्रय तुकाराम कोकाटे ,भगवान रामभाऊ गायकवाड यांचा समावेश आहे.