परभणी मनसे शहराध्यक्ष खून प्रकरणातील आरोपीला सेलूत पोलीसांनी पकडले
By राजन मगरुळकर | Published: September 12, 2022 04:20 PM2022-09-12T16:20:55+5:302022-09-12T16:22:39+5:30
परभणी व सेलू येथे पोलीस पथकाचा सापळा लावला होता.
परभणी : सेलू उपविभागीय कार्यालयातील पोलिसांनी सोमवारी सेलू स्टेशन परिसरात सापळा लावत परभणी जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील हत्ये प्ररणातील आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सेलू उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील हत्या घटनेतील आरोपी सोमवारी सचखंड एक्स्प्रेसने परभणीकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी परभणी व सेलू येथे पोलीस पथकाचा सापळा लावला होता. सदर आरोपी सेलू रेल्वे स्थानकावर सचखंड रेल्वेतून दुपारी १ वाजता उतरला. तो स्टेशनमधुन बाहेर येताच सापळा लावलेल्या सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त पोउपनी जमीलोद्दीन जागीरदार व पो.ना.एन एम रनमाळ, अनिल हत्तीअंबिरे, शिवाजी दुधाटे यांनी परभणी गुरन ३८८/२०२२ कलम ३०२ भ द वी मधील आरोपी विजय मारोती जाधव यांस शीताफीने पकडुन ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड हे पोलीस ताफ्यासह हजर झाले.