चारित्र्यावर संशय घेऊन उकळती भाजी फेकली पत्नीच्या तोंडावर; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल

By मारोती जुंबडे | Published: August 13, 2022 05:27 PM2022-08-13T17:27:55+5:302022-08-13T17:29:18+5:30

पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

The cruel act of the husband, doubting wife's character, threw boiling gravy on his wife's face | चारित्र्यावर संशय घेऊन उकळती भाजी फेकली पत्नीच्या तोंडावर; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल

चारित्र्यावर संशय घेऊन उकळती भाजी फेकली पत्नीच्या तोंडावर; निर्दयी पतीवर गुन्हा दाखल

Next

मानवत (परभणी) : तालुक्यातील खडकवाडी येथे पत्नीवर संशय घेऊन निर्दयी पतीने आपल्या पत्नीच्या तोंडावर उकळती भाजी फेकून जखमी केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत संबंधित महिला ६ टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी शुक्रवारी पती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील खडकवाडी येथील पूजा अर्जुन लंगडे (२५) या आपल्या कुटूंबासह राहतात. कुटुंबात पती, तीन महिन्याच मुल आणि सासू सासऱ्यांचा समावेश आहे. पूजा ह्या ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे घरात स्वयंपाक करत होत्या. गॅसवर भाजी आणि भाकरी करीत असताना पती अर्जुन लंगडे हा घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करायला सुरवात केली. वाद वाढतच गेल्याने पती अर्जुनने पत्नीच्या चेहऱ्यावर गॅसवरील उकळती भाजी पत्नीच्या तोंडावर फेकली. गरम भाजी चेहऱ्यावर पडल्याने आरडाओरड केल्यानंतर सासू-सासरे घरात आले. त्यांनी पती अर्जुनला बाजूला केले. 

दरम्यान, गरम भाजी चेहऱ्यावर पडल्याने गंभीर जखम झाली. चेहऱ्याची आग थांबत नसल्याने सासू-सासऱ्यांनी पूजाला मानवत येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणून परत घरी आणले. दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट रोजी सकाळी कार्यक्रमाच्या निमित्त सासू सासरे बाहेर गावी गेले होते. घरी पती-पत्नी दोघेच असताना पती अर्जुनने आज तुला फाशी देऊन मारतो अशी धमकी पूजाला दिली. घरी कोणी नसल्याने व भीती वाटत असल्याने कुणाला न सांगता पूजाने आपले माहेर (वरुड ता. जिंतूर) गाव गाठले. वडिलांना झालेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर वडिलांनी परभणी येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मागील चार दिवसापासून शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. १२ ऑगस्ट रोजी पूजा लंगडे यांच्या तक्रारीवरून पती अर्जुन लंगडे याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक ताठे हे करत आहेत.

महिलेचा चेहरा ६ टक्के भाजला
संशय घेऊन गॅसवर असलेली नॉनव्हेज गरम भाजी तोंडावर फेकल्याने पूजा लंगडे हिचा चेहरा ६ टक्के भाजला असल्याचे समोर आले आहे. पुढील तीन दिवस परभणी येथील शासकीय रुग्णालय परभणी येथे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: The cruel act of the husband, doubting wife's character, threw boiling gravy on his wife's face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.