शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 07:36 PM2024-09-02T19:36:47+5:302024-09-02T19:37:38+5:30

अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे

The sky fell on the farmer; 400 chickens and 9 goats died after water entered the arena | शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या

शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या

पाथरी - तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यातच पात्री मंडळात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार उडाला. मंडळात एकाच दिवशी तब्बल ३१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे ओढ्यानाल्यांना प्रचंड पूर आला आहे.  

दरम्यान, तालुक्यातील बोरगव्हान येथील एका शेतकरी भगवान नारायणराव खुडे यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. गट क्र १७३ मध्ये खुडे यांची शेती असून मुसळधार पावसाचे पाणी थेट त्यांच्या आखाड्यात शिरले. यामुळे तब्बल ४०० कोंबड्याचा मृत्यू झाला. तर ९ शेळ्याही पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. यासोबतच ४० तुषार पाईप, मोटार, स्टार्टर, ३०० फूट वायर, चार्जिंग फवारा असे शेतीचे सामान देखील वाहून गेले. तसेच शेतातील पीक देखील अतिवृष्टीने नष्ट झाले.

Web Title: The sky fell on the farmer; 400 chickens and 9 goats died after water entered the arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.