जिंतूर ते येलदरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी खड्ड्यात बसून केले जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 03:11 PM2024-10-11T15:11:47+5:302024-10-11T15:12:31+5:30

जिंतूर ते येलदरी रस्त्यावरील खड्यात जेवण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा ग्रामस्थांनी निषेध केला

The villagers had lunch sitting in the pit for the repair of Jintur to Yeldari road | जिंतूर ते येलदरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी खड्ड्यात बसून केले जेवण

जिंतूर ते येलदरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी खड्ड्यात बसून केले जेवण

जिंतूर ( परभणी) : जिंतूर- येलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठं मोठी खड्डे पडले आहेत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने बुधवारी दुपारी ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून 'खड्डे जेवण' करत निषेध व्यक्त केला. 

या भागातील नागरिकांना विदर्भात जाण्यासाठी जिंतूर ते येलदरी हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शिवाय परीसरातील अनेक गावात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, मागील काही दिवसांपासून रस्त्यावर जागोजागी मोठंमोठी खड्डे पडली आहेत. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात होत असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

वेळोवेळी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे येलदरी, शेवडी, माणकेश्वर, केहाळ, आंबरवाडी आदी गावातील त्रस्त ग्रामस्थांनी जिंतूर- येलदरी रस्त्यावरील खड्ड्यांनी दीड हजारचा आकडा पार केल्याने शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना खड्डे जेवणाचे खास पत्रिका पाठवून निमंत्रण दिले. बुधवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यात बसून जेवणाच्या पंगतीचे आयोजन केले होते. यावेळी आंदोलकांसह इतर ग्रामस्थांनी  निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला दरम्यान, नागरिकांनी आज केलेल्या अनोखे आंदोलनामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता.

Web Title: The villagers had lunch sitting in the pit for the repair of Jintur to Yeldari road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.