तिघांची दुचाकी चोरीस; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:23 AM2021-08-18T04:23:39+5:302021-08-18T04:23:39+5:30
जिल्ह्यात सेलू, मानवत, परभणीनंतर आता गंगाखेड शहर व परिसरातून दुचाकी वाहने चोरीस जाण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. त्यानुसार गंगाखेड ...
जिल्ह्यात सेलू, मानवत, परभणीनंतर आता गंगाखेड शहर व परिसरातून दुचाकी वाहने चोरीस जाण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. त्यानुसार गंगाखेड शहरातील भाजी मंडई भागातील सुनील भरत घरजाळे यांनी त्यांची एमएच २० ईसी ४००४ क्रमांकाची दुचाकी ११ ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या घरासमोर हॅण्डल लॉक करून उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ च्या सुमारास त्यांची दुचाकी जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. शोधाशोध करूनही दुचाकी सापडली नाही. याबाबत त्यांनी १४ ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना शहरातील खडकपुरा गल्ली भागात घडली. येथील शेख रफिक शेख फारूख यांनी त्यांची एमएच २२ एई १०४५ क्रमांकाची दुचाकी १४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची दुचाकी जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी १६ ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिसरी घटना पूर्णा तालुक्यातील वझुर येथे घडली. येथील अनिल गणेश खोडके यांनी त्यांची एचएच २२ एजी १३५२ क्रमांकाची दुचाकी १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गावातील मंदिरासमोर उभी करून ते या भागात झोपी गेले. दुपारी ४ वाजता ते झोपेतून उठले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात १५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.