निसर्गाकडून सतत शिकायला मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:30 AM2020-12-03T04:30:13+5:302020-12-03T04:30:13+5:30
बोरगावकर म्हणाले, आई गेल्यानंतर पोरकेपण दूर करण्यासाठी सतत नदीवर जायचो. त्यातूनच निसर्ग वाचायला लागलो. माझं इवलसं निसर्ग वाचन आणि ...
बोरगावकर म्हणाले, आई गेल्यानंतर पोरकेपण दूर करण्यासाठी सतत नदीवर जायचो. त्यातूनच निसर्ग वाचायला लागलो. माझं इवलसं निसर्ग वाचन आणि माझी जगण्याची प्रक्रिया म्हणजे ‘नदिष्ट’ असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाच्या विराट संपर्कात वारंवार आलो तर आपण विराट होतो, असे काही नाही. पण त्या विराटाची कणभर माती आपल्या अंगाला लागते. ही माती म्हणजे माझ्यासाठी नदिष्ट आहे. बालपणी हुलबा नावाच्या मित्रांच्या सहवासात निसर्ग वाचायला शिकलो. पुढे त्याचा हात सुटला आणि जीम कार्बेटचा हात धरुन अनुभव घेत राहिलो. अनुभव नुसते घेऊन चालत नाही तर ते नेकीने मांडून ठेवावे लागतात. फुलपाखराच्या चुंबनासारखे आपलं नातं हळूवार असलं पाहिजे. हेच नात मी नदीशी जपण्याचा प्रयत्न केला, असे बोरगावकर यांनी यावेळी सांगितले. प्रा.हनुमान व्हरगुळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.