घरात कापूस आहे, येथे फटाके वाजवू नका म्हटल्याने शेतकऱ्यास मारहाण, चारजणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 01:51 PM2024-11-04T13:51:01+5:302024-11-04T13:51:34+5:30
तांडपांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
परभणी : घरात कापूस आहे, फटाके वाजवू नका असे म्हटल्याच्या कारणावरून मारहाणीची घटना तांडपांगरी गावात घडली. याप्रकरणी चारजणांविरुद्ध दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एकनाथ भगवान वैरागर यांनी फिर्याद दिली की, २९ ऑक्टोबर रोजी चुलत भाऊ सोपान रावसाहेब वैरागर यांची मुले घरासमोर फटाके वाजवत होते. त्यावेळी घरात कापूस आहे, फटाके वाजवू नका असे म्हटल्याने एकनाथ वैरागर यांच्यासह पुतण्या गोपीचंद वैरागर यांना शिवीगाळ करून फिर्यादीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून दुखापत केली.
यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वच्छलाबाई वैरागर, किशन वैरागर यांनाही अनिकेत वैरागर, शिवकांता सोपान वैरागर, पार्वती रावसाहेब वैरागर यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात ३० ऑक्टोबर रोजी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि. बळेगाव करीत आहेत.