पाथरी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीमध्ये मनरेगावर एक छदामही खर्च नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:49 PM2018-10-10T13:49:52+5:302018-10-10T13:52:39+5:30
तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मनरेगाचे यंत्रणा आणि ग्रामपंचायत स्तरावर एकही काम सुरू नाही अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी ) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर शासन भर देत आहे. असे असताना तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मनरेगाचे यंत्रणा आणि ग्रामपंचायत स्तरावर एकही काम सुरू नाही अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
विषेश म्हणजे 2018 - 19 या वर्षात या ग्रा प आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही, पर्यायाने गेल्या सहा महिण्यात या गाव कार्यक्षेत्रात योजनेवर छदाम ही खर्च झाला नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास अली आहे. त्यामुळे योजनेच्या कामाकडे प्रशासकीय यंत्रणा किती उदासीन आहे ही बाब दिसून येते.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने विविध 29 प्रकारच्या कामाचा समावेश केला आहे, तसेच अकरा कलमी कार्यक्रम ही हाती घेतला आहे, दर वर्षी 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत पुढील वर्षी च्या कामाचे आराखडे आणि लेबर बजेट तयार केले जातात, मात्र वास्तवात हे नियोजन कागदावर राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मनरेगा योजने अंतर्गत 50 टक्के कामे यंत्रणा स्तर आणि 50 टक्के कामे जिल्हा परिषद स्तरावर म्हणजेच ग्रा प स्तरावर केली जातात.मागील काही वर्षात ग्राप स्तरावर बहुतांश कामे सिंचन विहिरीची घेतली जात आहेत.ग्राप कढूनही त्याच कामाची मागणी होत आहे.यंत्रणा स्तरावर शेत रस्ते, नालासरळीकर , वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण , शेततळी, तुती लागवड या कामाचा समावेश आहे.यंत्रणा स्तरावर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेशीम कार्यालय या विभागा मार्फत कामे केली जातात.
मात्र, तालुक्यातील मनरेगा योजनेच्या कामात या सर्वच यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे 21 गावात मनरेगा योजनेचे एकही यंत्रणेचे काम सुरू नाही. गावात मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांचे स्थलांतर वाढले आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने या गावात मनरेगाची कामे सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
गावांची यादी :