थर्माकोलची होडी उलटून ऊसतोड कामगारांची दोन मुले बुडाली; २४ तासानंतरही शोध लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 05:23 PM2021-04-09T17:23:22+5:302021-04-09T17:23:49+5:30

गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पालम तालुक्यातील देऊळगाव दुधाटे शिवारात पाथरी तालुक्यातील ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी आले आहेत.

Thermocol boat capsized, drowning two children of sugarcane workers; No search after 24 hours | थर्माकोलची होडी उलटून ऊसतोड कामगारांची दोन मुले बुडाली; २४ तासानंतरही शोध लागेना

थर्माकोलची होडी उलटून ऊसतोड कामगारांची दोन मुले बुडाली; २४ तासानंतरही शोध लागेना

Next
ठळक मुद्देदोन्ही मुलांच्या पालकांसह ऊसतोड कामगारांनी नदीपात्राकडे धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध सुरू केला.

गंगाखेड (जि. परभणी) : गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेली ऊसतोड कामगारांची दोन मुले पाण्यात बुडाली. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देउळगाव दुधाटे (ता. पालम) येथे घडली. २४ तासानंतरही शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत या मुलांचा शोध लागला नव्हता.

गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पालम तालुक्यातील देऊळगाव दुधाटे शिवारात पाथरी तालुक्यातील ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी आले आहेत. या कामगारांची तीन मुले ८ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उसाच्या फडापासून जवळच असलेल्या गोदावरी नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. तिघांपैकी बालाजी कुंडलिक राठोड (२२) व युवराज मदन राठोड (१२, दोघे रा. लोणी (धर्मे) तांडा, ता. पाथरी) हे दोघे नदीकाठावर असलेल्या थर्माकॉलच्या होडीवर बसून नदी पात्रात उतरले. मात्र, होडीचा तोल गेल्याने दोघेही नदी पात्रात पडले. काठावर असलेल्या मुलाने ही माहिती फडावर जाऊन पालकांना दिली. 

दोन्ही मुलांच्या पालकांसह ऊसतोड कामगारांनी नदीपात्राकडे धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. मात्र, त्या दोघांचाही २४ तासानंतरही शोध लागला नाही. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, जमादार रतन सावंत, कर्मचारी दत्तराव पडोळे, कृष्णा तंबूड आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Web Title: Thermocol boat capsized, drowning two children of sugarcane workers; No search after 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.