सेलू पोलीसांच्या खडा पहाऱ्याला चोरट्यांनी चकवा देत घातला सशस्त्र दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 01:35 PM2022-10-27T13:35:39+5:302022-10-27T13:39:11+5:30
मारोती नगर मधील कर सल्लागाराच्या घरातून रोख ६० हजार व १३ तोळे लुटल्याचे प्राथमिक अंदाज.
देवगावफाटा (जि.परभणी): एकीकडे सेलू शहरात काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रना रात्रभर खडापहारा देत असतांना दुसरीकडे त्यास चोरट्यांनी चकवा देत मारोती नगर भागात रेल्वे पटरीच्या दिशेने शेवटी असलेल्या कर सल्लागार चंद्रमुगलेश्वर मोहन नागुल यांच्या घरी गुरूवारी पहाटे तीन वा. सुमारास सशस्त्र दरोडा टाकुन रोख ६० हजार रूपये व १३ तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की,चोरट्यांनी गुरुवारी पहाटे ३ वा. सुमारास कंपाउंड वॉल वरून प्रवेश करत हातोडीने मुख्य दरवाजा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश केला. एका खोलीतील मुगलाबाई यांना उठवत चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत खोलीतील कपाट फोडले व त्यातील रोख ४० हजार व ४ तोळे सोने घेतले. नंतर एक जण मुख्य दरवाज्यापाशी थांबला. इतर ६ जणांनी वरच्या मजल्यावरील कर सल्लागार चंद्रमुगलेश्वर नागुल यांच्या बेडरूमला लक्ष करत त्यातील रोख २० हजार व ९ तोळे सोने लुटले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी बाजुच्या खोलीत झोपलेले गुरूशंकर मोहन नागुल यांचे खोलीला चोरट्यांनी धक्कासुध्दा दिला नाही.
चोरट्यांनी सोबत घेतलेली बँग काही आंतरावर नेऊन उघडून त्यामधील साहित्य घेऊन रेल्वे पटरी दिशेने पोबारा केला. दरम्यान चाकुचा धाक दाखवलेल्या मुगलाबाई यांनी घाबरलेल्या स्थितीत उशीरा हि माहिती गुरूशंकर मोहन नागुल यांना दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. टँक्स कन्सल्टंट चंद्रशेखर मोहन नागुल हे दिवाळी सणानिमित्त मुळ गाव करीमनगर (हैद्राबाद) येथे गेले होते. तर त्यांची आई लक्ष्मी मोहन नागुल ह्या शहरातील एका दवाखान्यात ड्युटीवर होत्या अशी माहिती पुढे आहे.
सदर प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुदर्शन ममुक्का यांनी ११:१५ वा.भेट दिली.यावेळी फिंगर प्रिंट व डॉग पथक कार्यरत होते.याबाबत तपासाची दिशा ठरविण्यासाठी ममुक्का यांनी पो.नी.गाडेवाड यांना सुचना दिल्या आहेत.