सकाळीच चोरट्यांची साधला डाव; दागिने बनविणाऱ्याच्या घरात घुसून लुटला सोन्याचा ऐवज

By ज्ञानेश्वर भाले | Published: February 15, 2024 04:27 PM2024-02-15T16:27:58+5:302024-02-15T16:28:19+5:30

चोरट्यांनी दागिने बनविणाऱ्या मंजुरास मारहाण करुन लुटला सोन्याचा ऐवज

Thieves made a plan in the morning; A jeweler's house was broken into and looted of gold | सकाळीच चोरट्यांची साधला डाव; दागिने बनविणाऱ्याच्या घरात घुसून लुटला सोन्याचा ऐवज

सकाळीच चोरट्यांची साधला डाव; दागिने बनविणाऱ्याच्या घरात घुसून लुटला सोन्याचा ऐवज

सेलू (जि.परभणी) : सोन्याची मजुरी काम करणाऱ्याच्या घरी गुरूवारी सकाळी सव्वाआठला तिघांनी प्रवेश करून कुटुंबातील सदस्यांना चाकुने धाक दाखवत मारहाण करून १ लाखाच्या सोन्याचा ऐवज लुटला. शहरातील क्रांती चौक परिसरातील ही घटना असून शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून तपास मोहीम सुरू आहे.
 
सोन्याचे दागिने बनवणारा मजूर अनिल जाना (रा. मिदकर पश्चिम बंगाल) हा शहरातील क्रांतीचौक परिसरात वास्तव्यास आहे. गुरूवारी सकाळी ८:१५ ला सोन्याची वस्तू घ्यायची असे म्हणत अनिल जाना यांच्या दुसऱ्या मजल्यावरील दरवाजावर थाप दिली. दरवाजा उघडताच अज्ञात तिघांनी घरात प्रवेश करीत चाकुने धाक दाखवत पती पत्नींना मारहाण करून महिलेच्या गळ्यातील १ लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती समजतात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ, पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ यांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, श्वान व फिंगर पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

सीसीटीव्ही फुटेजमधून दिसला थरार...
घटना घडल्यानंतर समोर आलेल्या सिसीटीव्ही फुटेजमध्ये अनिल जाना यांनी दरवाजा उघडताच तिघांपैकी एकाने जाना यास चाकुने मारहाण करीत त्यांना ताब्यात ठेवले. इतर दोघांनी घरात महिलेस मारहाण करीत सोन्याचा ऐवज तपासत चोरटे घरात फिरले. मारहाणीचा ४ मिनीटाचा धरार अंगावर शहरारे आणणारा आहे. अखेर लहान मुलाने पळत जाऊन दरवाजा उघडला. यावेळी बाहेरील दोन तिन जणं घरात येताच चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून धूम ठोकली. यादरम्यान महिलेच्या गळ्यातील १ लाखाचे सोने चोरीला गेले असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Thieves made a plan in the morning; A jeweler's house was broken into and looted of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.