अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपीही अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:21 AM2021-09-22T04:21:16+5:302021-09-22T04:21:16+5:30
तालुक्यातील डिघोळ तांडा येथील अल्पवयीन मुलीला बोलावून पडक्या शाळेमध्ये तिघांनी अत्याचार केल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली होती. त्यामुळे ...
तालुक्यातील डिघोळ तांडा येथील अल्पवयीन मुलीला बोलावून पडक्या शाळेमध्ये तिघांनी अत्याचार केल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली होती. त्यामुळे पीडित मुलीने १४ सप्टेंबर रोजी विष प्राशन केले होते. लातूर येथे उपचार सुरू असताना
२० सप्टेंबर रोजी पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पीडितेच्या मामाच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. २० सप्टेंबर रोजी पोलिसांनी
दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले होते. तर तिसरा आरोपी सुशील शिंदे (३०) फरार होता. परळी- धर्मापुरी रोडवरील आखाड्यावरून २० सप्टेंबर रोजीच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनीे या आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, पोलीस कर्मचारी महेश कवठाळे, अमोल जगताप आदींनी केली.