तेरा पोलीस अधिकाऱ्यांची परभणी जिल्ह्याबाहेर बदली, दहा नवीन अधिकारी जिल्ह्यात येणार
By राजन मगरुळकर | Published: June 28, 2023 06:21 PM2023-06-28T18:21:24+5:302023-06-28T18:21:55+5:30
नांदेड परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या
परभणी : नांदेड परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस आस्थापना मंडळातील नि:शस्त्र पोलीस निरीक्षक, नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक यांच्या परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये बदली केल्या आहेत. या बदली आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षक आणि आठ सहायक पोलीस निरीक्षक हे जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने जाणार आहेत, तर अन्य तीन जिल्ह्यांतून परभणीमध्ये पाच पोलीस निरीक्षक आणि पाच सहायक पोलीस निरीक्षक बदलीने रुजू होणार आहेत.
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी मंगळवारी हे प्रशासकीय बदलीचे आदेश काढले आहेत. यामध्ये नि:शस्त्र पोलीस निरीक्षक आणि नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे.
या पोलीस निरीक्षकांची बदली
पूर्णेचे सुभाषचंद्र मारकड यांची नांदेड जिल्ह्यात, गणपत राहिरे यांची हिंगोली जिल्ह्यात, सोनपेठचेे सुनील रितवाड यांची लातूर जिल्ह्यात, नरेंद्र पाडळकर यांची हिंगोली जिल्ह्यात, गंगाखेडचे वसुंधरा बोरगावकर यांची नांदेड जिल्ह्यात बदली झाली आहे.
या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बदली
विजय रामोड हिंगोली जिल्ह्यात, शिवाजी देवकते नांदेड जिल्ह्यात, बळवंत जमादार निलंबित असल्याने बदली नाही, रमाकांत नागरगोजे यांची लातूर जिल्ह्यात, आश्रोबा घाटे यांची नांदेड जिल्ह्यात, गंगाधर गायकवाड यांची नांदेड जिल्ह्यात, सुरेश मान्टे यांची नांदेड जिल्ह्यात, शिवकुमार मुळे यांची नांदेड जिल्ह्यात बदली झाली आहे.
हे अधिकारी जिल्ह्याला मिळणार
लातूर येथील सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, नांदेड येथील मल्हारी शिवरकर, नांदेड येथील सुनील लहाने, विजयकुमार कांबळे हिंगोली येथील माधव कोरंटलू, नांदेड येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, दिलीप तिडके, अवधूत कुशे, संजय ननवरे आणि लातूर येथील चितांबर कामठेवाड हे परभणीला पोलीस निरीक्षक म्हणून बदलून येणार आहेत.