मोंढ्यात उभ्या जीपच्या काचा फोडून साडेतीन लाख रूपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 07:33 PM2021-09-20T19:33:15+5:302021-09-20T19:33:15+5:30

गंगाखेड शहरातील आयडीबीआय बँकेतून साडेतीन लाख रूपये होते

Three and a half lakh rupees was smashed by breaking the glass of a vertical jeep | मोंढ्यात उभ्या जीपच्या काचा फोडून साडेतीन लाख रूपये लंपास

मोंढ्यात उभ्या जीपच्या काचा फोडून साडेतीन लाख रूपये लंपास

Next
ठळक मुद्देपालम शहरातील मोंढा परिसरातील घटना

पालम ः चारचाकी गाडीच्या काचा फोडून आतील साडेतीन लाख रूपये लंपास करण्यात आले आहेत. ही घटना पालम शहरातील मोंढा परिसरात आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. 

पालम तालुक्यातील उमरा येथील साहेबराव माधवराव उगले ( वय 45) यांनी गंगाखेड शहरातील आयडीबीआय बँकेतून साडेतीन लाख रूपये काढले. ते स्वतःच्या जीपमध्ये ( एमएच-22, एएम-2882 ) मधल्या सिटवर एका बॅगमध्ये ठेवले. या पैशातून बांधकामाचे साहित्य खरेदी करण्यासाठी साहेबराव उगले पालम शहरात आले होते. त्यांनी मोंढा परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानासमोर गाडी उभा केली. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी जीपच्या मधल्या सीटची काच फोडून पैशांची बॅग लांबविली. शहरातील एका पेट्रोलपंपावर गेल्यानंतर उगले यांच्या हा प्रकार लक्षात आला. बॅगमध्ये पैशांसोबत काही आवश्यक कागदपत्रे देखील लंपास झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Three and a half lakh rupees was smashed by breaking the glass of a vertical jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.