कारचोरी प्रकरणात तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:53+5:302021-03-13T04:31:53+5:30

पुणे येथील सचिन रमेश टिळेकर हे पूर्णा येथे ४ मार्च रोजी उसणे दिलेले पैसे परत घेण्यासाठी आले होते. यावेळी ...

Three arrested in car theft case | कारचोरी प्रकरणात तिघे जेरबंद

कारचोरी प्रकरणात तिघे जेरबंद

Next

पुणे येथील सचिन रमेश टिळेकर हे पूर्णा येथे ४ मार्च रोजी उसणे दिलेले पैसे परत घेण्यासाठी आले होते. यावेळी संबंधित माऊली महाराज हा व्यक्ती पैसे घेऊन येतो म्हणून त्यांची एम.एच.१२-एम.एल. ०८०० क्रमांकाची इनोव्हा कार घेऊन गेला, तो परत आलाच नाही. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्णा पोलीस व स्थानिक गुन्हा शाखा यांची दोन पथके या प्रकरणी तपासकामी नियुक्त करण्यात आली होती. या पथकांनी शोध सुरु केला. यातील आरोपी माऊली महाराज हा ओळख लपवून राहत होता. तो वसमत येथे आल्याची माहिती मिळाली. तसेच त्याने चोरलेली इनोव्हा कार चुडावा हद्दीतून जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पूर्णा व चुडावा पोलिसांच्या मदतीने इनोव्हा कार चालक प्रकाश गंगाराम ताटे (रा.वसमत) यास ताब्यात घेतले. याबाबतची चाहूल लागताच आरोपी माऊली महाराज परभणीहून सेलूमार्गे पळून जात असताना सेलू पोलिसांच्या मदतीने त्यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याचे नाव बबन सखाराम थोरात (रा.कुसगाव, लोणावळा जि.पुणे) असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वेगवेगळे पत्ते असलेले ओळखपत्र आढळून आले. तो डबल पैसे देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले. आतापर्यंत त्याने अनेक वाहने चोरली. त्यातील चार गुन्हे उघड करण्यात आली आहेत. त्यात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कर्नाटक पासिंगची एक आय२० कार, कोतवाली ठाण्याच्या हद्दीतून एक बुलेट, पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून इनोव्हा कार व वसमत ठाण्यातील एक गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले. तसेच आरोपीचा साथीदार कृष्णा गुलाब येडे याच्याकडून शासनाने बंदी घातलेल्या १ लाख १५ हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात तीन आरोपी निष्पन्न झाले असून आणखी काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा तपास पूर्णा ठाण्याचे सपोनि. धुमाळ करीत आहेत.

Web Title: Three arrested in car theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.