पूर्णा स्थानकावर रेल्वेची तीन डब्बे रुळावरून घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 15:06 IST2019-04-11T15:05:54+5:302019-04-11T15:06:51+5:30
पूर्णा रेल्वे यार्डात घडला प्रकार

पूर्णा स्थानकावर रेल्वेची तीन डब्बे रुळावरून घसरली
पूर्णा (परभणी) : पूर्णा रेल्वे यार्डातून प्लॅट फॉर्म वर गाडीचे रिकामे डब्बे नेताना यातील तीन डब्बे रुळावरून खाली घसरल्याचा प्रकार आज दुपारी (दि 11) येथील रेल्वे स्थानक परिसरात घडला. यात कसलीही हानी झाली नाही.
या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती वरून पूर्णा परळी ही पसेंजर गाडी पूर्णा रेल्वे स्थांनकावरून 4 वाजता निघते. या गाडीचे डब्बे स्वछ करून ते प्लॅट फॉर्मवर लावत असताना अंडर ग्राउंड ब्रिज भागात या रिकाम्या गाडीचे तीन डब्बे रेलव्य रुळावरून खाली घसरले. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर दुर्घटना निवारण गाडी व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होणार आहेत. नेमका हा प्रकार कशामुळे घडला हे समजू शकले नाही.