यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 01:10 PM2018-12-30T13:10:10+5:302018-12-30T13:14:22+5:30
सेलू ते मानवत रोड महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीने समोरून येत असलेल्या दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सेलू - यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सेलू ते मानवत रोड महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीने समोरून येत असलेल्या दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास निपाणी टाकळी पाटीजवळ हा अपघात घडला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील चार जण सेलू येथे सुरू असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त आलेले विविध कार्यक्रम पाहण्यासाठी शनिवारी रात्री सेलूत आले होते. यात्रा आटोपून दुचाकीवरून ढेंगळी पिंपळगाव कडे जात असताना निपाणी टाकळी पाटीजवळ परभणीकडून सेलूकडे भरधाव वेगात येत असलेल्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक (एम.एच.22 यु 8222) ने समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील सिध्दार्थ शेषेराव मगर (28), अविनाश महादेव मकासरे (30), सिध्दार्थ आसाराम दवंडे (30)हे तिघेजण जागीच ठार झाले तर कुलदीप आसाराम पंडागळे(28) हा गंभीर जखमी (सर्व रा. ढेंगळी पिंपळगाव ता.सेलू जि.परभणी) झाला आहे.