परभणी जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:37 PM2019-10-22T23:37:50+5:302019-10-22T23:38:08+5:30
२०१९-२० या रबी हंगामामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : २०१९-२० या रबी हंगामामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. या क्षेत्रावर ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही नगदी पिके घेतली जातात. त्यातून मिळालेल्या उत्पादनातून बळीराजा आपल्या एका वर्षाची आर्थिक घडी बसवितो. तर रबी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, बाजरी ही पिके दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे या रबी हंगामाला मोठे महत्त्व आहे. गतवर्षी जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७० हजार ७१२ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील सहा तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच बरोबर इतर तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिथिती असल्याने केवळ १ लाख ६८ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावरच रबी हंगामात पेरणी करण्यात आली होती. यामध्ये गव्हासाठी गतवर्षी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २० हजार ८२२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. मात्र २३ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. एवढीच एक समाधानाची बाब गतवर्षीच्या रबी हंगामात दिसून आली. तर रबी ज्वारीसाठी १ लाख ७८ हजार ४७८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते;परंतु, ८३ हजार ९६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली होती. विशेष म्हणजे दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने ९४ हजार ५०९ हेक्टर क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले होते.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये गव्हासाठी ३६ हजार, रबी ज्वारीसाठी १ लाख १४ हजार, करडईसाठी २ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात रबी हंगामातील पेरणी सुरू आहे. विशेष म्हणजे १९, २० व २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जरी फटका बसला असला तरी रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, करडई, गहू या पिकांच्या पेरणीसाठी मात्र हा पाऊस उपयुक्त झाला आहे. त्यामुळे गतवर्षीचा हातून गेलेला रबी हंगाम यावर्षी मात्र भरभरून देईल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आगामी काळात एक दोन चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना हा हंगाम उभारी देणारा ठरणार आहे.
जायकवाडीच्या पाण्याचा लाभ
४यावर्षीच्या पावसाळ्यात जायकवाडी धरण १०० टक्के भरले. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. परिणामी या नदीपात्रात उभारण्यात आलेले परभणी जिल्ह्यातील मुदगल, ढालेगाव, डिग्रस हे बंधारे तुडुंब भरले आहेत.
४त्यामुळे या बंधाºयातील पाण्याचा रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील लाभधारक शेतकºयांमध्ये समाधान आहे.
४दुसरीकडे निम्न दुधना प्रकल्प मृत साठ्यातच असल्याने दुधना नदीकाठावरील शेतकºयांना रबी हंगामात कमी पाण्यावरील पिकेच घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.