परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्प तुडूंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:25 AM2019-11-23T00:25:46+5:302019-11-23T00:26:49+5:30

जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

Three projects in Parbhani district were filled to the brim | परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्प तुडूंब भरले

परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्प तुडूंब भरले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही चांगला पाऊस पडल्याने पूर्णा नदीवरील खडकपूर्णा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. या पाण्याने त्या खालील येलदरी धरण सद्यस्थितीत १०० टक्के भरल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याशिवाय सिद्धेश्वर धरणात ९८.२० टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याबाहेरील औरंगाबादचा जायकवाडी प्रकल्प १०० टक्के भरला असून माजलगाव येथील प्रकल्प ९९.७० टक्के भरला आहे. याशिवाय जिल्ह्यातील मासोळी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही १०० टक्के पाणी झाले आहे. पालम तालुक्यातील तांदुळवाडी व गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री, जिंतूर तालुक्यातील बेलखेडा हे प्रकल्पही १०० टक्के भरले आहेत. याशिवाय जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पात ८४.२० टक्के, पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात ८१.३० टक्के, पाथरी तालुक्यातील झरी प्रकल्पात ९२.५० टक्के, सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी येथील प्रकल्पात ६६.८० टक्के, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी तलावात ६०.१० टक्के, दगडवाडी तलावात ९३.८० टक्के, डोंगरपिंपळा तलावात ८४.७० टक्के, भेंडेवाडी तलावात ९८.३० टक्के, जिंतूर तालुक्यातील देवगाव तलावात ६४.७० टक्के, कवडा तलावात ७६.३० टक्के, मांडवी तलावात ६२.५० टक्के, चारठाणा तलावात ३९.६० टक्के, दहेगाव तलावात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे.
८ प्रकल्पांचा पाणीसाठा चिंताजनक
४दुधना नदीवरील निम्न दुधना प्रकल्पात फक्त १३.३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूरसह सेलू, परभणी, जिंतूर आदी तालुक्यातील या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांची चिंता वाढली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात फक्त ९.४ टक्के तर परभणी तालुक्यातील पेडगाव तलावात ७.७ टक्के, मानवत तालुक्यातील आंबेगाव तलावात २४.३ टक्के, जिंतूर तालुक्यातील जोगवाडा तलावात १९.६० टक्के, जिंतूर तालुक्यातील चिंचोली तलावात १९.३० टक्के, आडगाव तलावात १६.७० टक्के, केहाळ तलावात २२.४० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात या तलाव परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

Web Title: Three projects in Parbhani district were filled to the brim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.