तीन हजार ९०० विद्यार्थी देणार एमपीएससी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:58+5:302021-03-21T04:16:58+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १४ मार्च रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षेचे नियोजन केले होते. मात्र ही परीक्षा रद्द झाली ...

Three thousand 900 students will give MPSC exam | तीन हजार ९०० विद्यार्थी देणार एमपीएससी परीक्षा

तीन हजार ९०० विद्यार्थी देणार एमपीएससी परीक्षा

Next

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १४ मार्च रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षेचे नियोजन केले होते. मात्र ही परीक्षा रद्द झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेऊन २१ मार्च रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार रविवारी सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या दोन सत्रांमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी संच पद्धतीने लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेसाठी १५ उपकेंद्र प्रमुख, ६२ पर्यवेक्षक, १७८ समावेशक, १८ सहायक कर्मचारी आणि ३० शिपायांची परीक्षेसाठी नियुक्ती केली आहे.

एक कर्मचारी कोरोनाबाधित

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची १५ मार्च रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळला असल्याची माहिती प्राप्त झाली. या कर्मचाऱ्याला वगळून इतर कर्मचाऱ्यांची प्रशासनाने परीक्षेसाठी नियुक्ती केली आहे.

Web Title: Three thousand 900 students will give MPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.