गंगाखेड येथे अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले; जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 08:00 PM2018-06-20T20:00:55+5:302018-06-20T20:00:55+5:30
जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगाखेड येथे गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळु उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर पकडले.
गंगाखेड (परभणी ) : जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगाखेड येथे गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळु उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर पकडले. यानंतर तिन्ही ट्रॅक्टर गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.
शहराजवळील गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन होते. हे रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी वारंवार नदी पात्रात धाडी टाकल्या. मात्र, येथील वाळू तस्करी थांबली नाही. मंगळवारी या पात्रात वाळूचे अवैध उत्खनन होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना मिळाली. यावरून त्यांनी आज सकाळी ६ वाजेच्या दरम्यान रेल्वे पुलाजवळील पात्रात धाड टाकत अवैधरित्या वाळु उपसा करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी शिवाजी मुरकुटे, अव्वल कारकुन दत्तराव बिलापट्टे, दिलीप कासले, भालेराव आदी तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तिथे बोलावुन घेत त्यांच्या ताब्यात तिन्ही ट्रॅक्टर दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केलेल्या या कारवाई मुळे वाळु माफियांत खळबळ उडाली होती.