परभणी शहरातून तिघांच्या दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:19+5:302021-09-08T04:23:19+5:30
पूर्णा तालुक्यातील वझुर येथील भानुदास देविदास कचरे यांचा मुलगा आजारी असल्याने तो परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. ...
पूर्णा तालुक्यातील वझुर येथील भानुदास देविदास कचरे यांचा मुलगा आजारी असल्याने तो परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. ३ सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास ते जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात त्यांची एमएच २२, एसी ०९८१ क्रमांकाची दुचाकी उभी करून दवाखान्यात मुलाला पाहण्यासाठी गेले होते. तासाभरानंतर ते परत आले असता जागेवरून दुचाकी गायब असल्याचे दिसून आले. याबाबत कचरे यांनी ५ सप्टेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना विद्यानगर भागात ३ सप्टेंबर रोजी घडली. औरंगाबाद येथील भीमा मोहन पंडित हे नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. रात्री ९.३० च्या सुमारास त्यांनी त्यांची एम.एच. २०, एफएन ७६८२ क्रमांकाची दुचाकी या भागातील विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी ही दुचाकी जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. याबाबत पंडित यांनी ४ सप्टेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना शहरातील जिजाऊ नगर भागात २ सप्टेंबर रोजी घडली. पेडगाव येथील प्रशांत मनोहरराव हरकळ हे शहरातील जिजाऊ नगर भागातील आर्यवृत्त कॉलनी भागात राहतात. त्यांनी या दिवशी रात्री ९ च्या सुमारस त्यांची एम.एच.२२, वाय ३८५७ क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी दुचाकी जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. याबाबत हरकळ यांनी ४ सप्टेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून अज्ञात चोरट्याविरोधात ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.