तीन वर्षांत राज्य रेल्वे फाटकमुक्त करणार, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:11 AM2018-06-25T07:11:09+5:302018-06-25T07:11:20+5:30
राज्यात येत्या तीन वर्षांत रेल्वे फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली़
परभणी : राज्यात येत्या तीन वर्षांत रेल्वे फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली़
सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत कार्यालय वझूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी ११ वाजता पूर्णा तालुक्यातील वझूर गावाजवळ गोदावरी नदीवर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ़मोहन फड, अॅडग़ंगाधरराव पवार, आ़डॉ़मधुसूदन केंद्रे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, आबासाहेब पवार, बबनराव पवार, माधव दुधाटे, मुंजाभाऊ शिंदे, अॅड़अशोकराव शिंदे यांची उपस्थिती होती़
पाटील म्हणाले, शेतीमाल बाजारपेठेत आणण्यासाठी रस्ते व पुलांची नितांत आवश्यकता असते़ आघाडी शासनाने याकडे दुर्लक्ष केले़ मात्र या शासनाकडून शेतकऱ्यांना मागणी करण्याआधीच त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जात आहे़ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राज्यातील १६ हजार गावे पाणीदार करण्यात आली आहेत़ त्यामुळे येत्या काळात शेतकºयांचे सर्व प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले़
भाजप सरकार शेतक-यांच्या हिताचे- दानवे
भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर पीक विमा, आणेवारीच्या पद्धतीत बदल करून शेतकºयांना न्याय देण्याचे काम केले आहे़ त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच पीक विम्याच्या माध्यमातून राज्य शासनाने परभणी जिल्ह्यासाठी भरभरून मदत केली. शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेऊन मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध करून दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी सांगितले़
पीक विम्यापोटी जिल्ह्याला १०६ कोटी रुपये- लोणीकर
परभणी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १०६ कोटी रुपये मंजूर केले आहेत़ येत्या आठ दिवसांत पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकºयांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येतील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले़