थरारक ! धावत्या इलेक्ट्रीक मोपेडने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 07:30 PM2021-12-01T19:30:24+5:302021-12-01T19:31:00+5:30
अचानक मोपेडने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने बाजूला उडी घेतली.
देवगावफाटा (परभणी ) : एका धावत्या इलेक्ट्रीक मोपेडने अचानक पेट घेतल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान सेलू शहरातील नुतन रोडवर घडली. आगीत मोपेड पूर्णतः भस्मसात झाली आहे. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही.
इंधनाचे वाढत असल्याने अनेक जन इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्राधान्य घेत आहेत. ढेगंळी पिपंळगाव येथील दादाराव श्रीरंग सोळंके यांनी सुद्धा तीन महिन्यांपूर्वी एक इलेक्ट्रिक मोपेड घेतली. आज सायंकाळी सेलू शहरातील विद्यानगरमधून बसस्थानकाकडे ते इलेक्ट्रीक मोपेडवरून जात होते. नूतन कन्या शाळेपासून काही अंतरावर जाताच मोपेडमधून अचानक धूर निघू लागला. सोळंके यांना काही कळायच्या आत मोपेडने पेट घेतला. प्रसंगावधान राखत सोळंके यांनी पेटती मोपेड सोडून बाजूला उडी घेतली. यानंतर काही वेळातच मोपेड आगीत पूर्णतः जाळून खाक झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्या चालकांमध्ये काहीशी चिंता निर्माण झाली आहे.