शनिवारच्या पावसाने ज्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:57+5:302021-03-22T04:15:57+5:30

परभणी : शनिवारी रात्री जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात ज्वारीचे पीक आडवे झाले असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचेही मोठे ...

Tide with Saturday's rain | शनिवारच्या पावसाने ज्वारी

शनिवारच्या पावसाने ज्वारी

Next

परभणी : शनिवारी रात्री जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात ज्वारीचे पीक आडवे झाले असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

परभणीसह पालम, जिंतूर, पाथरी आणि मानवत तालुक्यामध्ये शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली. पालम तालुक्यातील डिग्रस, फरकंडा, बरबडी या गावांमध्ये गारपीट झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातील सुमारे २०० हेक्‍टर क्षेत्रावरील ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. तसेच वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी कैऱ्या गळून पडल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा, हिवरखेडा, घडोळी, सावळी केहाळ या भागात पाऊस झाला. पावसाचे प्रमाण कमी असले तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. तसेच ज्वारीचे पीक आडवे झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रूक आणि परिसरातही गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात बहुतांश पिके आता काढणीला आली आहेत. काढणीपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

Web Title: Tide with Saturday's rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.