विधानसभा निवडणुकीचे होमगार्डस्‌चे थकले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:30 AM2021-02-18T04:30:43+5:302021-02-18T04:30:43+5:30

विविध निवडणुका, सण, उत्सव, समारंभ आदी प्रसंगी बंदोबस्तात पोलिसांना मदत करण्याची महत्वपूर्ण भूमिका होमगार्डस्‌ निभावत असतात. हे होमगार्ड ...

Tired honorarium of home guards for assembly elections | विधानसभा निवडणुकीचे होमगार्डस्‌चे थकले मानधन

विधानसभा निवडणुकीचे होमगार्डस्‌चे थकले मानधन

googlenewsNext

विविध निवडणुका, सण, उत्सव, समारंभ आदी प्रसंगी बंदोबस्तात पोलिसांना मदत करण्याची महत्वपूर्ण भूमिका होमगार्डस्‌ निभावत असतात. हे होमगार्ड पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर संबधित ठिकाणी अविरत कार्यरत असतात. यासाठी राज्य शासनाकडून या होमगार्डस्‌ना बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या प्रत्ळेक दिवसासाठी ६९० रुपये प्रतिदिन मानधन देण्यात येते. जिल्ह्यात एकूण ९०० होमगार्डस्‌ आहेत. यातील जवळपास ८७० होमगार्डस्‌ बंदोबस्त कामी नियुक्त असतात. राज्य विधानसभेच्या ऑक्टोबर २०१९ मध्ये निवडणुका झाल्या. त्यानंतर बंदोबस्त कामी नियुक्त होमगार्डस्‌ना यासाठीचे मानधन मिळणे अपेक्षित होते; परंतु हे मानधन अद्याप मिळालेले नाही. शिवाय डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ या महिन्याचेही मानधन या होमगार्डस्‌ना मिळालेले नाही. त्यामुळे होमगार्डस्‌मधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रत्येक दिवसाला मिळतात ६९० रुपये

बंदोबस्त कामी नियुक्त प्रत्येक होमगार्डस्‌ यांना प्रत्ळेक दिवसासाठी ६९० रुपये मानधन दिले जाते. संपूर्ण महिनाभर होमगार्डस्‌ना काम दिले जात नाही. त्यामुळे त्यांना दरमहा नियमित मानधन देण्यात यावे, अशी मागणी होमगार्डस्‌च्या वतीने करण्यात येत आहे.

जानेवारी व डिसेंबर या दोन महिन्यांत जवळपास ३० दिवस कामावर होतो. या ३० दिवसांचे मानधन अद्याप मिळाले नाही. त्यापुर्वी चे मानधन मिळाले आहे.

-शेख शगीर, होमगार्ड, सेलू.

नोव्हेंबर २०१७ मधील १७ दिवसांचे, ग्रा. प. निवडणूकीचे व डिसेंबर व जानेवारीतील ३० दिवसाचे मानधन बाकी आहे.

-कादर पठाण, होमगार्ड, सेलू

काम केले तरच मानधन देणे हा निर्णय अयोग्य आहे. खरेतर ठराविक रक्कम महिना देण्याचा निर्णय व्हावा अशी आमची ईच्छा आहे.

-विठ्ठल गायकवाड, होमगार्ड, परभणी

वेळेवर मानधन मिळाले तर अर्थिक ताण कमी होऊ शकतो. शिवाय ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना काम दिले जात नाही. त्यामुळे उदरनिर्वाहसाठी मानधन समतोल असणे गरजेचे आहे.

- प्रकाश गुंड, होमगार्ड, परभणी

Web Title: Tired honorarium of home guards for assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.