स्टेडियम भागातील स्वच्छतागृहाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:23+5:302021-01-10T04:13:23+5:30
नारायण चाळ भागात वाहतुकीची कोंडी परभणी : शहरातील नारायण चाळ भागामध्ये वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. या परिसरात चौक ...
नारायण चाळ भागात वाहतुकीची कोंडी
परभणी : शहरातील नारायण चाळ भागामध्ये वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. या परिसरात चौक नसल्याने चारही बाजूंनी येणारी वाहने एकत्र येतात. परिणामी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
बसस्थानकातील बसपोर्टचे काम ठप्प
परभणी : येथील बसस्थानक परिसरात उभारण्यात येत असलेले बसपोर्टचे काम दोन महिन्यांपासून ठप्प आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी निधी उपलब्ध असतानाही वरिष्ठ कार्यालयाकडून तो उपलब्ध होत नसल्याने पुढील काम बंद आहे. एसटी महामंडळाने याकडे लक्ष देऊन बसपोर्टचे काम त्वरित सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
सौर दिवे वर्षभरापासून बंद
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात खेळाडूंच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेले सौर पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. या सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे पथदिवे सुरू करण्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू
परभणी : नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत अनेक भागांत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले नाही. सध्या राजगोपालाचारी उद्यान परिसरात हे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील इतर भागांतही जलवाहिनी टाकली जात आहे.
रोहयोच्या कामांना मिळेना गती
परभणी : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे संथ गतीने सुरू आहेत. रोहयोसाठी एक लाखापेक्षा अधिक मजुरांनी नोंदणी केली असताना या मजुरांना काम उपलब्ध होत नाही. प्रशासनाने कामे वाढवावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.
प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण वातावरण तापले
परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. गावागावात वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. मतदारांच्या थेट भेटी घेण्यावर उमेदवारांनी आता भर दिला आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचाही या निवडणुकीत वापर वाढविण्यात आला आहे. प्रत्यक्ष प्रचाराबरोबरच सोशल मीडियातून प्रचाराने जोर धरला आहे.
आचारसंहितेमुळे रखडली नागरिकांची कामे
परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे विकासकामांना ब्रेक लागला आहे. आचारसंहितेमुळे उपलब्ध झालेला निधी त्या त्या कामांना वितरित करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या तरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू असून, विकासकामे थांबलेली आहेत.