परभणीतील राहटी बंधारा दुरुस्तीसाठी टोलवाटोलवी : कागदी घोडे नाचवण्याचे नाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:08 AM2018-05-17T00:08:20+5:302018-05-17T00:08:20+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयाच्या प्लेटस् गंजल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार कळवूनही पूर्णा पाटबंधारे विभागातून बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने परभणीकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयाच्या प्लेटस् गंजल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार कळवूनही पूर्णा पाटबंधारे विभागातून बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने परभणीकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़
पूर्णा नदीवर २० वर्षापूर्वी राहटी येथे कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला आहे़ या बंधाºयात साठविलेले पाणी परभणी शहरासाठी वापरले जाते़ या बंधाºयाच्या निर्मितीच्या वेळी टाकलेल्या प्लेटस् आता गंजल्या आहेत़ जागोजागी गंजलेल्या प्लेटस्मधून पाण्याचा अपव्यय होत आहे़ विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांत दोन वेळा या प्लेट निकामी झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार घडला होता. तर एप्रिल महिन्यातही एक प्लेट खराब झाल्याने शहराला पाणी पुरवठा होऊ शकला नव्हता़
राहटी येथील बंधाºयाला एकूण ४७ कप्पे असून, या कप्प्यांमध्ये ३५२ लोखंडी प्लेट टाकलेल्या आहेत़ या प्लेट बंधाºयातील पाणी रोखून धरण्याचे काम करतात़ २० वर्षापूर्वी टाकलेल्या प्लेट आता पूर्णत: गंजल्या आहेत़ त्यामुळे नदीपात्रातून बंधाºयात पाणी सोडल्यानंतर अनेक वेळा पाण्याचा दाब सहन न झाल्याने प्लेटा वाकतात आणि पाण्याचा अपव्यय होतो़ यापूर्वी तीन ते चार वेळा अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे परभणी शहराला निर्जळीला सामोरे जावे लागत आहे़ ही बाब लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेने पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार पत्रव्यवहार केला़ शहरवासिंयाच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता सर्वच्या सर्व प्लेटा तत्काळ बदलून द्याव्यात, जेणे करून पाण्याचा अपव्यय होणार नाही, अशी मागणी कण्यात आली़ जिल्हाधिकाºयांमार्फतही हा पत्रव्यवहार करण्यात आला आहे़ परंतु, पूर्णा पाटबंधारे विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही़ त्यामुळे सध्या जुन्याच प्लेटांवर बंधाºयाची भिस्त आहे़ उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता बंधारा दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेणे अपेक्षित आहे; परंतु, पूर्णा पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीसाठी टोलवाटोलवी केली जात आहे़
दीड दलघमी क्षमतेचा हा बंधारा आहे़ बंधाºयात गाळही मोठ्या प्रमाणात साचल्याने केवळ एक दलघमी पाणी साठवण्याची क्षमता या बंधाºयाची झाली आहे़ बंधाºयाच्या दुरुस्तीबरोबरच गाळ काढण्याचे कामही करावे लागणार आहे़
मात्र पाटबंधारे विभागाकडून या संदर्भात गांभीर्याने घेतले जात नाही़ बंधाºयाची वेळेत दुरुस्ती झाली नाही तर भर उन्हाळ्यात परभणीकरांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़
...तर पाणीप्रश्न गंभीर
बंधाºयाच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाचे असून, बंधाºयातील पाणी उपसा महापालिकेमार्फत केला जातो़ त्यामुळे दुरुस्तीची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असतानाही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही़ यापूर्वी बंधाºयातून प्लेट निकामी झाल्याने पाणी वाया गेले होते. असा प्रकार पुन्हा होवू नये, यासाठी तातडीने बंधाºयाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे़ मात्र चार वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभाग दखल घेत नसल्याचे दिसते़
केवळ कागदोपत्रीच प्रश्नोत्तरांचा खेळ
परभणी शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे़ राहटी बंधाºयाचे पाणी शहरवासियांसाठी अपुरे पडत आहे़ त्यामुळे बंधाºयात उपलब्ध झालेले पाणी शहरवासियांसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी महानगरपालिकेने वारंवार पूर्णा पाटबंधारे विभागाकडे बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला आहे़ यासंदर्भात वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महानगरपालिकेने पाठविलेला ३५२ फळ्या (प्लेटस्) बदलण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे़ एवेढच उत्तर मनपाला दिले आहे़ मात्र पाणीप्रश्नासारख्या गंभीर प्रश्नावर यापुढे कोणतीही कारवाई झाली नाही़ परिणामी परभणीकरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़