ऑक्सिजन प्रकल्पाची टोपे यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:53+5:302021-09-25T04:17:53+5:30
आरोग्य मंत्री राजेश टोपे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. सकाळी १० वाजण्याच्या टोपे हे जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. कोरोनाच्या ...
आरोग्य मंत्री राजेश टोपे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. सकाळी १० वाजण्याच्या टोपे हे जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नवजात शिशू दक्षता कक्षाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची पाहणी करुन संबंधिातांना आवश्यक त्या सूचना केल्या.
आरोग्य विभागाच्या २५ व २६ सप्टेंबर रोजी गट क व ड पदांसाठी होणाऱ्या परीक्षा होणार आहे. यासाठी नूतन विद्यालयात परीक्षा केंद्र असल्याने राजेश टोपे यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रकाश डाके आदींची उपस्थित होते.
राज्यातील साधारणत: ६ हजार २०० पदांसाठी ही परीक्षा होत असून, ८ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्राधिकृत केले असून, त्यांच्यामार्फतही प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. परीक्षार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले.