आता व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी घ्यावे लागणार परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:41+5:302021-06-18T04:13:41+5:30
परभणी : महानगरपालिकेच्या हद्दीत विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आता मनपाकडून व्यवसाय करण्याचा परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आयुक्त ...
परभणी : महानगरपालिकेच्या हद्दीत विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आता मनपाकडून व्यवसाय करण्याचा परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आयुक्त देवीदास पवार यांनी गुरुवारी या संदर्भातील आदेश काढले. परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीने परभणी हद्दीतील सर्व लहान, मध्यम व मोठे व्यवसायधारकांना व्यवसाय परवाना दिल्या जाणार आहे.
प्रभाग समिती अ, ब, क अंतर्गत शहरातील व्यवसायधारकांना मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार परवाना देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तीन वर्ष, एक वर्षासाठी हे परवाने वितरित केले जाणार आहेत. शहरातील सोने-चांदी दागिणे कारागिर, सर्व प्रकारचे भांडी विक्रेते, होम अप्लायसेन्स, जनरल स्टोअर्स, बुक सेंटर, पेन, स्टेशनरी, क्रॉकरी, लेडीज एम्पोरिअम, ऑप्टीकल्स, कॉस्मेटीक, खेळणी, बॅग, सुटकेस, लॉटरी सेंटर, धार्मिक पूजा साहित्य विक्रेते, कटींग सलून, ब्युटी पार्लर, भंगार दुकाने, गादी घर, शेती औजारे विक्रेते, कृषी केंद्र आदी सर्व विक्रेत्यांना हे परवाने बंधनकारक केले आहेत. तेव्हा व्यापाऱ्यांना प्रभाग समिती कार्यालयातून नोंदणी प्रमाणपत्र द्यावेत, अशा सूचना आयुक्त देवीदास पवार, उपायुक्त प्रदीप जगताप यांनी सहायक आयुक्तांना दिल्या आहेत. परवाना देण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.