कंटेनर उलटल्याने पालम येथे राज्य महामार्गावर वाहतुक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 04:38 PM2017-12-23T16:38:40+5:302017-12-23T16:39:26+5:30
शहरातील लोहा राज्य महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. हा कंटेनर रस्त्यात आडवा उलटल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती.आज दुपारपर्यंत हा ट्रक काढण्यात आला नव्हता.
पालम (परभणी ): शहरातील लोहा राज्य महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. हा कंटेनर रस्त्यात आडवा उलटल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती.आज दुपारपर्यंत हा ट्रक काढण्यात आला नव्हता.
गंगाखेड ते लोहा या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १६ हा पालम शहरातून जातो. शहरातील या रस्त्यावर दुभाजक आहेत. मात्र, यास रेडीअम रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी हा दुभाजक वाहनचालकांना दिसत नाही. यामुळे दुभाजकाला धडकून येथे अशाच स्वरुपाची अपघात नियमित होतात.
शुकवारी रात्री सुद्धा एक रिकामे कंटेनर (एम.एच. २५ - यु़ - १४७९ ) दुभाजकावर आदळले. त्यानंतर कंटेनर उलटून जवळपास १०० फुट घासत पुढे गेले. हे कंटेनर आज दुपारपर्यंत हटविण्यात आले नव्हते. कंटेनर रस्त्याच्या मधोमध असल्याने या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरात यामुळे दिवसभर वाहतूक विस्कळीत होती.