बैलगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:34+5:302020-12-23T04:14:34+5:30

एन्ट्री मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप देवगाव फाटा : सेलू शहरातील विविध बँकांत ग्राहकांच्या पासबुकवर आवश्यक वेळी एन्ट्री करून मिळत ...

Traffic jam due to bullock carts | बैलगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

बैलगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

Next

एन्ट्री मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप

देवगाव फाटा : सेलू शहरातील विविध बँकांत ग्राहकांच्या पासबुकवर आवश्यक वेळी एन्ट्री करून मिळत नसल्याने ग्राहकांचा मनस्ताप वाढत आहे. त्यामुळे खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, ते कळत नसल्याने ग्राहकांची तारांबळ उडत आहे. अनेक वेळा ग्राहकांना आपल्या खात्यावर किती रक्कम आहे, याची माहिती नसते. वरिष्ठ बँक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

सेलू येथे फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा

देवगाव फाटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किमान सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालण होणे गरजेचे आहे; परंतु सेलू येथील किराणा, कापड, कृषी, हाॅटेल, भांडे यासह सर्वच आस्थापनांवर सोशल डिस्टन्स न पाळता खरेदी प्रक्रिया चालू आहे. कोरोनाचे सावट अजूनही कमी झाले नसल्याने या प्रकाराला आळा बसणे गरजेचे आहे.

प्रवासी वाहतुकीमुळे अडचण

सेलू : मोंढा परिसरात ग्रामीण भागातील प्रवाशांची वाहतूक करणारी वाहने उभी राहत असल्याने मोंढा परिसरात शेतमाल विक्री करण्यासाठी येत असलेल्या वाहनांची कोंडी होत आहे. परिणामी, सातत्याने वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.

कागदपत्रांची जुळवाजुळव

सेलू : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुकांची तहसील कार्यालयात गर्दी झाली होत असल्याचे दिसून येत आहे.

तहसील कार्यालयात दलाल सक्रिय

सेलू : ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने उमेदवारी अर्ज भरणे, तसेच उमेदवाराचा दररोजचा खर्च सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात दलालांना पॅनलप्रमुखांनी नेमले आहे. त्यामुळे दलालांचे फावले आहे.

वस्सा येथून पायी दिंडी औंढा येथे रवाना

वस्सा : जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील भाविकांची पायी दिंडी २२ डिसेंबर रोजी सकाळी औंढा नागनाथ येथील सिद्धेश्वर मठाकडे रवाना झाली. या दिंडीत १२५ पुरुष व ५४ महिला भाविकांनी सहभाग नोंदवला आहे. गेल्या ४५ वर्षांपासून ही दिंडी वस्सा येथून निघते.

राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमध्ये वाढ

पालम : पालम ते लोहा या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमध्ये वाढ झाली आहे. पुलावर तसेच पुलाच्या परिसरात अधिक खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.

Web Title: Traffic jam due to bullock carts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.