दुसऱ्या टप्प्यात ५४९ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:18+5:302021-01-08T04:52:18+5:30

मानवत : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील ...

Training of 549 employees in the second phase | दुसऱ्या टप्प्यात ५४९ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

दुसऱ्या टप्प्यात ५४९ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Next

मानवत : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील ५४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ६ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक शुभांगी गौंड, संपर्क अधिकारी अरुण जऱ्हाड, तहसीलदार डी. डी. फुफाटे, नायब तहसीलदार नकुल वाघुंडे, शेख वसीम, गटविकास अधिकारी वानखेडे, गटशिक्षणाधिकारी ससाने यांची उपस्थिती होती. मानवत तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, यासाठी १२७ बुथ आहेत. यामध्ये एकूण ७१२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ७१२ उमदेवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तालुक्यातील एकूण ६ प्रभागांतील निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये सावळी व जंगमवाडी येथील ग्रामपंचायतीमधील उमेदवारांचा समावेश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या वतीने मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण ६ जानेवारी रोजी देण्यात आले. यावेळी ईव्हीएम पथकप्रमुख मधुसूदन सोनवळकर, मास्टर ट्रेनर किशोर तुपसागर, विशाल मिटकरी, शशीकांत नेवरेकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Training of 549 employees in the second phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.