परभणी कृषी विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:36 AM2018-06-11T00:36:46+5:302018-06-11T00:36:46+5:30
महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (कृषी उपसंचालक) संवर्गातील सहा अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, आता या अधिकाºयांच्या जागी नवीन अधिकाºयांची प्रतीक्षा लागली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (कृषी उपसंचालक) संवर्गातील सहा अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, आता या अधिकाºयांच्या जागी नवीन अधिकाºयांची प्रतीक्षा लागली आहे़
महाराष्ट्र कृषी सेवा गट अ संवर्गातील राज्यामधील ९५ अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश कृषी पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव एस़एस़ धपाटे यांनी ८ जून रोजी काढले आहेत़ या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील कृषी उपसंचालक रक्षा शिंदे यांची बदली लातूर येथे विभागीय सांख्यिकी कार्यालयात झाली आहे़ तसेच जिल्हा बीज प्रक्रिया अधिकारी सागर खटकाळे यांची बदली परभणी येथेच उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून झाली आहे़ विभागीय बीज प्रक्रिया अधिकारी शेख मुजाहेद शेख जमीरोद्दीन यांची बदली बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी या पदावर करण्यात आली आहे़ कृषी विकास अधिकारी बळीराम कच्छवे यांची बदली हिंगोली येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे़ उपविभागीय कृषी अधिकारी आऱटी़ सुखदेव यांची बदली नांदेड येथे करण्यात आली आहे़ आत्माचे प्रकल्प उपसंचालक संतोष नादरे यांची बदली नांदेड येथे कृषी विकास अधिकारी या पदावर करण्यात आली आहे़
तर हिंगोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी उत्तम शिवणगावर यांची बदली परभणी येथे जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे़ लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील उपविभागीय कृषी अधिकारी विजयकुमार पाटील यांची बदली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कृषी उपसंचालक या पदावर करण्यात आली आहे़ लातूर येथील उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांची बदली परभणी येथे कृषी विकास अधिकारी या पदावर करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील सहा अधिकाºयांच्या बदल्या झाल्या असल्या तरी त्यांच्या जागी केवळ तीन अधिकाºयांना बदलीने नियुक्ती दिली आहे़ त्यामुळे उर्वरित तीन पदे रिक्त राहत असून, या जागी कोणत्या अधिकाºयांची नियुक्ती होते? याकडे लक्ष लागले आहे़