जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील रोहित्र नांदेडला पळविले; रामप्रसाद बोर्डीकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 06:42 PM2018-10-31T18:42:46+5:302018-10-31T18:45:23+5:30

माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसह महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षात घेराव आंदोलन केले़ 

transformer shifted to Nanded in the fund of District Planning Committee; The allegation of Ramprasad Bordiqar | जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील रोहित्र नांदेडला पळविले; रामप्रसाद बोर्डीकर यांचा आरोप

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील रोहित्र नांदेडला पळविले; रामप्रसाद बोर्डीकर यांचा आरोप

Next

परभणी : जिल्ह्यातील वीज समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेले विद्युत रोहित्र परस्पर नांदेडला वळविल्याचा आरोप करीत आज दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसह महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षात घेराव आंदोलन केले़ 

परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ ग्रामीण भागात १२-१२ तास लाईट राहत नाही़ शेतीला पाणी देण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत़ ग्रामीण भागातील अनेक विद्युत रोहित्र जळाले असून, ते महावितरणकडून तत्काळ बदलून दिले जात नाहीत़ विद्युत रोहित्रांमधील आॅईल संपले आहे़ अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे़ जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून महावितरणने गांभिर्याने विजेची कामे करणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याचे काम अधिकारी करीत आहेत़

जिल्हाभरात विद्युत रोहित्र मिळत नसल्याने आज माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी परभणी येथील महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय गाठले़ यावेळी अधीक्षक अभियंता कार्यालयात उपस्थित नव्हते़ संबंधित अधिकाऱ्यांना माजी आ़ बोर्डीकर यांनी याविषयी जाब विचारला़ जिल्ह्यातील वीज समस्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून रोहित्रांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ परंतु, या निधीतून १०० रोहित्र नांदेडला पळविण्यात आले़ परभणीच्या निधीतून नांदेडला रोहित्र देण्याचा अधिकार कोणी दिला? या विषयी बोर्डीकर यांनी जाब विचारला़ या आंदोलनानंतर बोर्डीकर यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांची भेट घेतली़ जिल्ह्यातील वीज समस्यांची माहिती त्यांना देण्यात आली़ त्यावर गुरुवारपर्यंत हे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिले़ यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़

Web Title: transformer shifted to Nanded in the fund of District Planning Committee; The allegation of Ramprasad Bordiqar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.