झाडे सुकू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:18+5:302021-03-16T04:18:18+5:30

स्वच्छतागृहांची दुरवस्था परभणी : येथील स्टेडियम परिसरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. जिल्हा स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी स्वच्छतागृह बांधले असून, त्या ठिकाणी ...

The trees began to dry up | झाडे सुकू लागली

झाडे सुकू लागली

Next

स्वच्छतागृहांची दुरवस्था

परभणी : येथील स्टेडियम परिसरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. जिल्हा स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी स्वच्छतागृह बांधले असून, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे खेळाडूंची कुचंबणा होत आहे.

गावे अंधारात

परभणी : महावितरण कंपनीने थकबाकी असलेल्या गावांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे अनेक गावे अंधारात आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, ग्रामस्थांना उकाड्यात रात्र काढावी लागत आहे.

उद्यानांची दुरवस्था

परभणी : शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. राजगोपालाचारी उद्यानात मुलांसाठी मोजक्याच खेळण्या ठेवल्या असून, त्याही तुटल्या आहेत. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठीही सुरक्षित साहित्य या ठिकाणी उपलब्ध नाही. इतर उद्यानाच्या दुरुस्तीकडेही मनपाचे दुर्लक्ष झाले आहे.

रस्त्याचे काम सुरू

परभणी : मानवत रोड ते परभणी या राष्ट्रीय महामार्गांतर्गत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा रस्ता उखडल्याने वाहनधारक त्रस्त होते. अखेर कंत्राटदाराने काम सुरू केले आहे. मानवत रोडपासून ते ताडबोरगावपर्यंत एका बाजूने रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

Web Title: The trees began to dry up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.