पाण्याअभावी वाळू लागली झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:05+5:302021-04-10T04:17:05+5:30
पुलाअभावी नागरिकांची गैरसोय परभणी : येथील भीमनगर रेल्वेगेट परिसरातील नागरिकांची मागील काही दिवसांपासून मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेच्या वाहतुकीमुळे ...
पुलाअभावी नागरिकांची गैरसोय
परभणी : येथील भीमनगर रेल्वेगेट परिसरातील नागरिकांची मागील काही दिवसांपासून मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेच्या वाहतुकीमुळे वारंवार रेल्वेगेट बंद केले जात असल्याने नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. या भागात भुयारी पूल किंवा उड्डाणपूल उभारावा, अशी येथील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आहे. मात्र रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळणी
परभणी : येथील देशमुख हॉटेल ते सुपर मार्केट या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. जायकवाडी कार्यालयाच्या समोर नालीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. कारेगाव रोड भागातील १० ते १५ वसाहतींसाठी हा रस्ता नेहमीचा वर्दळीचा असून मुख्य गावात येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. खड्डे बुजावावेत आणि वाहनधारकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.