जीपच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला ट्रकने चिरडले; नवदाम्पत्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 05:12 PM2019-07-26T17:12:51+5:302019-07-26T17:18:48+5:30
मृत पती-पत्नींचा तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
मानवत (परभणी ) : राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापुर येथे जीपच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला ट्रकने चिरडल्याने नवदाम्पत्यांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
पाथरील तालुक्याती पोहेटाकळी येथील भागवत गोंगे व आरती गोंगे हे पत्नी दुचाकीवरून मानवतकडे येत होते. रत्नापूरजवळ गोंगे यांनी जीपच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते समोरून येणाऱ्या ट्रकवर ( एमएच 04 - बी 9374 ) आदळले. जोरदार धडकेने आरती दूरवर फेकल्या गेल्या आणि पाठीमागून वेगाने येणारी जीप त्यांच्या डोक्यावरून गेली. तर भागवत हे ट्रकवर आद्ल्याने गंभीर जखमी झाले.
दोघाही जखमींना गणेश उक्कलकर, दत्ता शिंगणापूरे, दिपक कटारे या युवकांनी एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी आरती यांना तपासून मृत घोषित केले. तर भागवत यांना पुढील उपचारासाठी परभणीकडे नेण्यात आले. मात्र, त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. भागवत आणि आरती यांच्या लग्नाना फक्त तीन महिने झाले होते. या घटनेमुळे पोहेटाकळी गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळावरुन जीप चालक फरार असून ट्रकचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.