शिक्षण विभागातील दोन कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:30+5:302021-08-15T04:20:30+5:30
कर्मचारी-अधिकाऱ्यांना नोटिसांचा धडाका सीईओ टाकसाळे यांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध कारणांवरून नोटिसा देण्याचा धडाका लावला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी ...
कर्मचारी-अधिकाऱ्यांना नोटिसांचा धडाका
सीईओ टाकसाळे यांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध कारणांवरून नोटिसा देण्याचा धडाका लावला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांना चार कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षण विभागातील अन्य १४ कर्मचाऱ्यांना, तर बांधकाम विभागातील १६ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांतील फक्त बडेकर व रहीम शेख या दोनच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय प्रक्रियेनुसार सामान्य प्रशासन विभागाकडून या नोटिसा संबंधित कर्मचाऱ्यांना जाणे अपेक्षित असताना बहुतांश कर्मचाऱ्यांना सीईओ टाकसाळे यांच्या स्वीय साहाय्यकामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाला का डावलले गेले, असा सवाल उपस्थित होत आहे.
कर्मचाऱ्यांना नियमबाह्य प्रतिनियुक्त्या
जिल्हा परिषदेत काही मोजक्या कर्मचाऱ्यांना नियमबाह्य प्रतिनियुक्त्या देण्यात आल्याचा प्रकारही चर्चेत येत आहे. तालुक्याच्या ठिकाणी बदली झालेले कर्मचारी तेथील सेवेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच जिल्हा परिषदेत दाखल झाले असून, त्यांची विभागीय आयुक्तांची परवानगी न घेताच प्रतिनियुक्ती करण्यात आली असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमधून सुरू आहे.