दोन रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:54+5:302020-12-24T04:16:54+5:30

परभणी : जिल्ह्यात बुधवारी कोरोनावर उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग घटला ...

Two patients died in the district | दोन रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू

दोन रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू

Next

परभणी : जिल्ह्यात बुधवारी कोरोनावर उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग घटला असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही. गुरुवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक रुग्ण शासकीय रुग्णालयात तर दुसरा खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. आरोग्य विभागाने ३०० नागरिकांची तपासणी केली असून, त्यामध्ये १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआरच्या साहाय्याने १७५ आणि रॅपिड टेस्टच्या साहाय्याने १२५ जणांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात आता ७ हजार ५१२ एकूण रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ७ हजार ७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३०१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या १३४ रुग्ण उपचार घेत आहेत.

बुधवारी दिवसभरात परभणी शहरातील बँक कॉलनी येथील ५५ वर्षीय पुरुष, सोमनाथनगरातील ५७ वर्षीय पुरुष, कृषी सारथी कॉलनीतील २४ वर्षीय युवक, योगक्षम नगरातील २० वर्षांची युवती, बँक कॉलनीतील ४४ वर्षीय महिला, दत्तनगर भागातील २३ वर्षीय युवती आणि यशोधननगरातील २४ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील ४९ वर्षीय पुरुष, रामे टाकळी येथील २६ वर्षीय युवक, ५६ वर्षांचा पुरुष, ४७ वर्षांची महिला आणि ३० वर्षांचा युवक व २० वर्षांची युवती यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी येथील ४६ वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. १६ रुग्णांमध्ये परभणी तालुक्यात ९, मानवत तालुक्यात ६ आणि गंगाखेड तालुक्यात एका रुग्णाची नोंद झाली आहे.

Web Title: Two patients died in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.