टायर फुटल्याने मालवाहतूक टेम्पोला अपघात, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 04:56 PM2018-08-01T16:56:43+5:302018-08-01T17:03:20+5:30

नांदेड येथे किराणा सामान घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने झिरो फाटा येथे आज दुपारी १ वाजता अपघात झाला. यात दोघेजण जखमी झाले आहेत. 

Two persons injured in a tempo accident due to Tyre burst | टायर फुटल्याने मालवाहतूक टेम्पोला अपघात, दोघे जखमी

टायर फुटल्याने मालवाहतूक टेम्पोला अपघात, दोघे जखमी

Next
ठळक मुद्देजालना येथून मालवाहू टेम्पो (एमएच २१ एक्स २३१७ ) किराणा सामान घेऊन नांदेड येथे जात होता.यावेळी झिरो फाटा ते पूर्णा दरम्यान माटेगाव परिसरात अचानक टेम्पोचे एक टायर फुटले.

पूर्णा (परभणी) : नांदेड येथे किराणा सामान घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने झिरो फाटा येथे आज दुपारी १ वाजता अपघात झाला. यात दोघेजण जखमी झाले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, जालना येथून मालवाहू टेम्पो (एमएच २१ एक्स २३१७ ) किराणा सामान घेऊन नांदेड येथे जात होता. यावेळी झिरो फाटा ते पूर्णा दरम्यान माटेगाव परिसरात अचानक टेम्पोचे एक टायर फुटले. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यात चालक व वाहक दोघे जखमी झाले. 

सुदैवाने समोर कोणतेही दुसरे वाहन नसल्याने मोठा अपघात टळला. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले, सपोनि चंद्रकांत पवार, जमादार कोठेंकर, पोका समीर पठाण, समीर साबेर यांनी घटनास्थळी भेट दिली. 

 

Web Title: Two persons injured in a tempo accident due to Tyre burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.