दुकान फोडीतील दोन चोरटे पोलीसांच्या ताब्यात; तिघे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 07:13 PM2020-12-30T19:13:52+5:302020-12-30T19:18:48+5:30

शहरातील पंचायत समिती परिसरात संत गाडगेबाबा व्यापारी संकुलात असलेल्या किराणा दुकान, बियर शॉपीश अन्य एक दुकान २३ डिसेंबर रोजी फोडले.

Two thieves in shop burglary in police custody; Three fugitives | दुकान फोडीतील दोन चोरटे पोलीसांच्या ताब्यात; तिघे फरार

दुकान फोडीतील दोन चोरटे पोलीसांच्या ताब्यात; तिघे फरार

Next
ठळक मुद्देचोरी केलेला सुकामेवा आणि रोख रक्कम जप्त

गंगाखेड : शहरातील पंचायत समिती परिसरात असलेल्या किराणा दुकान, बिअर शॉपी व अन्य एक दुकान फोडून सुकामेवा व रोख रक्कम पळविणाऱ्या पाच चोरट्यांपैकी दोन चोरटे विशेष शाखेच्या पोलिसांनी बुधवारी पहाटे ताब्यात घेतले. चोरट्यांकडून चोरीस गेलेला सुकामेवा जप्त केला आहे. यातील तीन चोरटे मात्र फरारच आहे. फरार असलेल्या तिघांचा शोध घेणे सुरू आहे.

शहरातील पंचायत समिती परिसरात संत गाडगेबाबा व्यापारी संकुलात असलेल्या किराणा दुकान, बियर शॉपीश अन्य एक दुकान २३ डिसेंबर रोजी फोडले. यावेळी चोरट्यांनी प्रमोद चिंतामण कवठेकर यांच्या किराणा दुकानातील सुकामेवा व रोख रक्कम असा सुमारे पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. एकाच रात्रीत तीन दुकाने फुटल्याची घटना घडल्याने याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासात ही चोरी १) सुदर्शन तुळशीराम जाधव वय ३० वर्ष रा. तुळजाभवानी नगर गंगाखेड, २) विनोद बाबुराव लोखंडे वय २५ वर्ष रा.इंदिरा नगर परळी, ३) सूरज नितीन जाधव, ४) सुखदेव मारोती पवार रा. वसमत व ५) सुखदेव पवार याचा जावई लिंग्या यांनी केल्याचे उघड झाले.  दरम्यान, या गुन्ह्यातील सुदर्शन तुळशीराम जाधव व विनोद बाबुराव लोखंडे हे दोघे गंगाखेड शहरातील तुळजाभवानी नगरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

यावरून जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मिना यांच्या पथकातील पोउपनि विश्वास खोले, जमादार सुग्रीव केंद्रे, पो. ना. चिंचाणे, फारुखी, विष्णु भिसे यांनी सापळा रचून सुदर्शन तुळशीराम जाधव व विनोद बाबुराव लोखंडे या दोघांना ताब्यात घेतले. तसेच सुदर्शन जाधव यांच्या घरातून चोरीच्या गुन्ह्यातील एक किलो बदाम आणि सहा किलो खारीक जप्त करून दोघांनाही गंगाखेड पोलीसांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्यातील अन्य तीन चोरटे मात्र अद्यापही फरारच आहेत. 

Web Title: Two thieves in shop burglary in police custody; Three fugitives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.