साडेपाच हजार विद्यार्थांपैकी दोन हजार विद्यार्थी उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:25+5:302020-12-22T04:17:25+5:30
मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले आणि सर्व शाळांना कुलूप लागले. मागील दहा महिन्यापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी पालकांकडे ...
मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले आणि सर्व शाळांना कुलूप लागले. मागील दहा महिन्यापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी पालकांकडे घरीच आहेत. जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक वेळा पर्यन्त झाले. मात्र शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. इयत्ता १० आणि बारावीचे वर्ग २ डिसेंबर पासून सुरू झाले आहेत. या वर्गातील विध्यार्थी शहरी भागातील शाळेत विद्यार्थी संख्या ७५ टक्के पर्यन्त दिसुन आली आहे. आता २१ डिसेंबर पासून जिल्ह्यातील इयत्ता ९ आणि ११ विचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी समाधानकारक दिसून आली नाही. एकूण पटसंख्येच्या ३३ टक्केच विद्यार्थी उपस्थिती होते. अद्यापही पालकांची मानसिकता शाळाबाबत फारशी स्पष्ट दिसून येत नाही. त्यामुळेच साडेपाच हजार विद्यार्थांपैकी केवळ दोन हजार विद्यार्थी उपस्थित होते.
वाघाळा ते मुदगल बस प्रवसाची अडचण झाली दूर
इयत्ता ९ ते १२ पर्यन्त शाळा सुरू झाल्या. मात्र ग्रामीण भागातुन शहरात शाळेसाठी येण्यास बस नसल्याने विद्यार्थीनींना शहरात येता येत नाही. या भागातील काही विद्यार्थिनींनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणाताई वरपूडकर यांच्याकडे थेट तक्रार केली.२१ डिसेंबर रोजी दुपारी वाघाळा ते मुदगल विद्यार्थिनी सोबत प्रेरणताई वरपूडकर यांनी बस प्रवास करत अडचणी जाणून घेतल्या.
सोमवारी वर्गनिहाय उपस्थित विद्यार्थी
नववी - ५८८
दहावी -९२६
अकरावी -१५६
बारावी- २७३