दुचाकी-जीपचा समोरासमोर भीषण अपघात; पिता-पुत्र जागीच ठार
By ज्ञानेश्वर भाले | Updated: May 23, 2023 18:28 IST2023-05-23T18:27:47+5:302023-05-23T18:28:02+5:30
गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव पाटी परिसरात झाला अपघात

दुचाकी-जीपचा समोरासमोर भीषण अपघात; पिता-पुत्र जागीच ठार
गंगाखेड (परभणी): पालम या राष्ट्रीय महामार्गावर गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव परिसरात दुचाकी व जीपचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पिता-पुत्र जागीच ठार झाले. ही घटना २२ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
वाशिम जिल्ह्यातील तोडगाव येथील आकाश माधव खडसे हे बीड जिल्ह्यातील कुसळंबा येथे कामावर होते. सोमवारी आकाश खडसे हे पत्नी व मुलाला दुचाकीवरून पूर्णा तालुक्यातील गौर येथील सासरवाडीकडे येत होते. दरम्यान, गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव पाटी परिसरात दुचाकी क्रमांक एमएच ३७ एई ४३३०, जीप क्रमांक एमएच २६ आर २२२ या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात आकाश माधव खडसे (२५), गौरव आकाश खडसे (दीड वर्ष रा. तोडगाव, जि. वाशिम) हे पिता-पुत्र जागीच ठार झाले. तर वंदना आकाश खडसे (२३) जखमी झाल्या. त्याचबरोबर जीपमधील जब्बार मुख्तार पटेल (५०, रा. वाजेगाव, जि. नांदेड) हे जखमी झाले आहेत. नागरिकांनी वंदना खडसे व जब्बार मुक्तार पटेल या दोघांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून या जखमींना नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.