पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुधना पात्रातील पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 06:14 PM2023-07-09T18:14:59+5:302023-07-09T18:15:07+5:30
मयत दोन्ही युवक सेलू येथील गायत्री नगर भागातील रहिवासी.
रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी) : रविवारी दुपारी ४ वा.निम्न दुधना प्रकल्पाच्या गेट जवळ दुधना पात्रात पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला.रोहीत टाक आणि नितीन साळवे (दोघे रा.गायत्री नगर सेलू)असे मृत्यू पावलेल्या युवकांचे नांव आहेत हे पुढे आले आहे.
निम्न दुधना प्रकल्पाच्या गेट जवळ दुधनानदी पात्रात रविवारी दुपारी ४ वा. पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार मच्छिमार करणाऱ्या भोई यांनी बघितल्यामुळे पुढे आला.याबाबत प्रारंभी परतुर पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोउपनी कमलाकर अंभोरे हे काही कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मच्छीमार भाई बांधवांच्या मदतीने हे दोन्ही मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढले. रोहित दीपक टाक (वय २३, नितीन गुणाजी साळवे (वय २५) दोघेही राहणार गायत्री नगर सेलू अशी मयतांची ओळख पटली.
सदर घटनास्थळ हे सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे सदरील मृतदेह शेवछादानासाठी उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे आणण्यात आले अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांनी दिली.या पुढील कारवाई सेलू पोलीस ठाण्यात केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान घटनास्थळी पोहण्यापुर्वी या युवकांचे कपडे,चप्पल, मोबाईल आढळून आला आहे. या घटनेने गायत्री नगर मध्ये शोककळा पसरली आहे.