परभणी जिल्हा रुग्णालयातील प्रकार :प्रसुतीगृहात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:59 AM2018-12-26T00:59:43+5:302018-12-26T00:59:51+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला नाक दाबूनच प्रसुती कक्षात यावे लागते. या कक्षातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने माता व नवजात शिशूंच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला नाक दाबूनच प्रसुती कक्षात यावे लागते. या कक्षातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने माता व नवजात शिशूंच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात स्त्री रुग्णालयाला लागूनच प्रसुती कक्ष आहे. या कक्षात प्रवेश करतानाच प्रवेशद्वारासमोरच कचराकुंडी ठेवली असून त्यात टाकलेल्या कचºयाची दुर्गंधी पसरत आहे. प्रसुती कक्षातही नियमित स्वच्छता केली जात नसल्याने काही ठिकाणी कचरा असल्याचे दिसून आले. प्रसुतीकक्ष असलेली ही इमारत जुनी झाली असून या इमारतीचे प्लास्टर अनेक ठिकाणी उखडले आहे. स्वच्छतागृहाचे दरवाजेही जुने झाले असल्याने रुग्ण व नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. या विभागात प्रसुतीकक्ष आणि प्रसुती पश्चात कक्ष असून दोन्ही कक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे दिसून आले.
प्रसुती कक्षामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चांगली वागणूक मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत. याशिवाय स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी बाबी उपलब्ध नसल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयातील प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रसुती कक्षात नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
४प्रसुती कक्षाला लागूनच जिल्हा रुग्णालयाने स्वतंत्र स्त्री रुग्णालयाचा विभाग सुरु केला आहे. प्रसुती कक्षाच्या तुलनेत या विभागात नीटनेटकेपणा आहे; परंतु, या विभागामध्ये रुग्णच उपलब्ध नसल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे प्रसुती कक्षासाठी स्त्री रुग्ण विभागातील काही कक्षांचा वापर करणे शक्य आहे. प्रशासनाने स्त्री रुग्ण विभागाचा प्रसुती कक्षासाठी वापर केला तर महिलांची गैरसोय दूर होऊ शकते.
संख्या वाढल्याने मिळेनात सुविधा
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुतीकक्षामध्ये प्रसुतीसाठी दाखल होणाºया मातांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने माता या ठिकाणी प्रसुतीसाठी येतात; परंतु, या महिला रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. बेडची संख्या कमी असल्याने एका बेडवर २-२ महिलांची व्यवस्था केली जाते. प्रसुती कक्षामधील महिलांच्या नातेवाईकांना थांबण्याकरिता सुविधा नाही. त्यामुळे प्रसुती कक्षातच मातांच्या नातेवाईकांचीही गर्दी होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
या प्रसुती कक्षात स्वतंत्र सिझेरियन कक्षही आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्याने मोकळ्या जागेतही बेड टाकून रुग्णांची व्यवस्था केली असल्याचे दिसून आले.