कर्मचाºयाकडून मागविला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:45 AM2017-11-19T00:45:21+5:302017-11-19T00:45:43+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दात्याचे रक्तदान करून न घेतल्या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाºयाकडून प्रशासनाने खुलासा मागविला आहे़ ‘लोकमत’ने हे प्रकरण समोर आणल्यानंतर आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दात्याचे रक्तदान करून न घेतल्या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाºयाकडून प्रशासनाने खुलासा मागविला आहे़ ‘लोकमत’ने हे प्रकरण समोर आणल्यानंतर आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे़
येथील डॉ़ पवन चांडक हे १३ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या मित्रासमवेत रक्तदान करण्यासाठी गेले होते़ विशेष म्हणजे स्वइच्छेने रक्तदान करण्याची त्यांनी तयारी केली होती़ डॉ़ पवन चांडक रक्तपेढीमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचाºयाने रक्तदान करून घेण्यास टाळाटाळ केली़ या प्रकारानंतर डॉ़ चांडक यांनी आपले सरकार पोर्टलवर स्वत:चे अनुभव कथन केले़ डॉ़ चांडक यांच्या या तक्रारीची दखल घेत आपले सरकार पोर्टलवरून संबंधितांकडून या प्रकरणी खुलासा मागविला होता़ जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा प्रकार समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने १७ आॅक्टोबरच्या अंकात ‘प्रति जैविक औषधींचा तुटवडा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले़
त्यात डॉ़ चांडक यांना रक्तदान करण्यासाठी आलेल्या अडचणीही मांडल्या होत्या़ या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने कर्मचाºयाकडून या विषयीचा खुलासा मागविला आहे़ त्यामुळे या कर्मचाºयाविरूद्ध प्रशासन आता काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
रक्ताचा तुटवडा असतानाही उदासिनता
जिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे़ दररोज हजारो रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात़ अशा वेळी रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा असणे आवश्यक आहे़ रक्तपेढीच्या वतीने वेळोवेळी निवेदने काढून जिल्हा रुग्णालयात रक्तसाठा कमी असल्याचे सांगत रक्तदात्यांना आवाहन केले जाते़ मात्र स्वच्छेने येणाºया रक्तदात्यांनाच योग्य वागणूक मिळत नसल्याचे दिसून आले आहे़ डॉ़ पवन चांडक हे दरवर्षी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून गरजू रुग्णांसाठी रक्तदान करतात़ आतापर्यंत त्यांनी २२ वेळा रक्तदान केले आहे़ रक्तपेढीत रक्ताचा साठा उपलब्ध नसताना येणाºया प्रत्येक रक्तदात्याला अस्थेवाईक वागणूक देणे आवश्यक होते़ मात्र स्वत:हून दाते रुग्णालयात येवून रक्तदान करण्यास तयार असताना त्यांचे रक्तदान होत नसेल तर रुग्णालयातील रक्तसाठ्यात वाढ होणार कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे़ तसेच रक्तही अत्यावश्यक बाब असून, रक्तसाठा वाढविण्यासाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे़ मात्र केवळ उदासिन भूमिकेमुळे जिल्हा रुग्णालयातील रक्तसाठ्यात वाढ होत नसल्याचे दिसत आहे़