परभणीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:27 AM2018-03-05T00:27:09+5:302018-03-05T00:27:15+5:30

शहरातील साखला प्लॉट भागात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आढळला. शहरातील साखला प्लॉट परिसरात महानगरपालिकेच्या एका दवाखान्याचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामा शेजारी लहान मुले रविवारी क्रिकेट खेळत होती. यावेळी या मुलांना हा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली.

An unidentified woman's body was found in Parbhani | परभणीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

परभणीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील साखला प्लॉट भागात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आढळला.
शहरातील साखला प्लॉट परिसरात महानगरपालिकेच्या एका दवाखान्याचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामा शेजारी लहान मुले रविवारी क्रिकेट खेळत होती. यावेळी या मुलांना हा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली.
पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी, बाळासाहेब डोंगरे, गजानन जंत्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारणही अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे महिलेच्या मृत्यूविषयीचे गूढ आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या महिलेच्या मृत्यूविषयी अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
मयत झालेल्या या महिलेच्या अंगावर नऊवारी लुगडे असून, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. तसेच उजव्या पायावर कोड आहे. ही मृत महिला परभणी जिल्ह्यातीलच असावी, अशी शक्यता आहे. तेव्हा आपल्या परिसरातील अशा वर्णनाची महिला बेपत्ता असेल किंवा या मयत महिलेविषयी माहिती असेल तर कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केले आहे.

Web Title: An unidentified woman's body was found in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.