अनावश्यक शस्त्र परवान्यांनी गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:28+5:302021-07-02T04:13:28+5:30

मागील काही वर्षांमध्ये शस्त्र परवाने घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बंदूक, तलवार यासह इतर शस्त्रांसाठी अधिकृत परवाना घेतला जातो. परंतु, ...

Unnecessary weapons licenses increase crime | अनावश्यक शस्त्र परवान्यांनी गुन्हेगारीत वाढ

अनावश्यक शस्त्र परवान्यांनी गुन्हेगारीत वाढ

Next

मागील काही वर्षांमध्ये शस्त्र परवाने घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बंदूक, तलवार यासह इतर शस्त्रांसाठी अधिकृत परवाना घेतला जातो. परंतु, या परवानाधारक शस्त्राचा योग्य वापर होतो का? स्वत:च्या सुरक्षेसाठी परवाना दिला असताना इतरांना हानी पोहोचेल या पद्धतीने शस्त्राचा वापर होतो का, याविषयी पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरवर्षी दिलेल्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण केले जाते. शस्त्र परवाना ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे तेथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून या परवान्यांची पडताळणीही करण्यात येते. मात्र मागच्या काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारी घटना आणि त्यात होणारा शस्त्रांचा वापर पाहता परवान्यांची पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक अनावश्यक व्यक्तींना शस्त्र परवाने दिल्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शस्त्र परवाने देताना नियमांचे काटेकोर पालन करीत आवश्यक असणाऱ्यांनाच परवाना देणे गरजेचे झाले आहे.

त्या घटनेतील शस्त्र परवानाधारक होते का?

मागील आठवड्यात शहरातील दर्गा रोड भागात हवेत गोळीबार करण्याची घटना घडली होती. हा गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने ज्या बंदुकीतून गोळीबार केला, त्या बंदुकीस परवाना होता का, याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात परवानाधारक व्यक्ती शस्त्रांचा कुठे वापर करू शकतो, स्वत:च्या सुरक्षिततेसाठीच शस्त्राचा वापर झाला का, या बाबींची पडताळणी करणेही गरजेचे झाले आहे.

नियम कडक करण्याची आवश्यकता

शस्त्र परवाने घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने परवाने देताना नियम अधिक कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अनावश्यक व्यक्तींना शस्त्र परवाने दिल्यास गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढू शकतात, ही बाब लक्षात घेऊन शस्त्र परवाना देण्यासाठी आणखी कडक नियम करण्याची गरज आहे.

शस्त्रांचा वाढला वापर

जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींविरुद्धही पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. रात्रीच्या सुमारास शस्त्र हातात घेऊन फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विनापरवानगी शस्त्रे येतात कुठून? हे शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींचा नेमका उद्देश काय, याविषयी कसून तपासणी करण्याची गरज आहे.

Web Title: Unnecessary weapons licenses increase crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.